Thursday, September 28, 2006

H4 चे दिवस!

आय आय टी मधल्या नव्या ऍडमिशन्स नूकत्याच संपल्या होत्या. अभ्यानेही जॉइन केलं होतं! कधी वाटलं नव्हतं प्रवरा सोडताना की परत एकाच ठिकाणी राहायचा, काम करायचा योग येईल म्हणुन! पण आला होता! :-)

तिसरे सेम सुरू झालं होतं आणि जनता आपल्या आपल्या रामरगाड्यात मग्न झाली. होस्टेलवर फ़ारसं कूणी दिसेना. उदास वातावरण दिवसभर. फ़क्त लंच टाइमला मेसमध्ये आणि संध्याकाळी आख्ख्या होस्टेलमध्ये फ़ूल टू धमाल!

कॅरमबोर्ड वर "भाय"चं टोळकं त्याला चीअर करतंय... त्याचे opponents बदलताहेत पण हा पठ्ठ्या कूणातरी सोम्या गोम्याला पार्टनर बनवून (कधी कधी तो मी पण असायचो!) एक एक opponent ची वाट लावतोय! स्ट्राइकर "भाय"च्या हातात असला की कमीत कमी हॅट-ट्रिक तर ठरलेलीच! समोरचा ऍटेम्प्ट सुद्धा करणार नाही अशा कॉइन्स हा लीलया 'टाकायचा'. आर्धे प्रतिस्पर्धी तर त्याचा असा 'कॉन्फ़ी' पाहूनच हरायचे! भायचा पार्टनर बनुन त्याचा गेम पाहायला खतरनाक मजा यायचीच पण त्यापेक्षा पण मी एन्जॉय करायचो त्याचा प्रतिस्पर्धी बनुन त्याला हरवणं! कुठल्याही सोम्या गोम्याला हरवण्यात काय मजा यार? ;-)

"भाय" के खिलाफ़ खेलके... उसके कॉन्फ़ीसे लडके उसको हराके जब उसको कॅरमबोर्डसे भगाते थे ना तो पूरे H4 में "H44444444.... H4444444444" के नारे गुंजते थे! :-))

काय मजा यायची... हरवणारा एकदम 'instant celebrity' बनायचा! अर्थात २ राउंड्नंतर "भाय" नावाचा 'जख्मी शेर' त्याच्या समोर बसून त्याचा फ़न्ना उडवायचा ही गोष्ट वेगळी! तेव्हाचा भायचा गेम तर एकदम बहारदार! तोपर्यंत हसत खेळत, ह्याची त्याची टर उडवत खेळणार्या भायला तेव्हा त्याची "रेप्युटेशन" परत मिळवायची असे! त्यामुळे फ़ूल कॉन्सन्ट्रेशन! :-)

पण तिसरे सेम सुरू झाले तसे कॉलेजचे दिवस संपायचे वेध लागले. सहा महिन्यात आपण इथून बाहेर पडणार... पण जाणार कुठे?

भायचा कॅरम बघायला मजा यायची पण लगेच वाटायचं - आयला ह्या भायची नोकरी पक्की आहे! हा आता मस्त Scientific Officer Grade C बनुन लगेच गॅझेटेड ऑफ़िसर बनणार आहे! आपण कुठे जाणार?
जसजसे दिवस जात होते तसतसा "जाणार कूठे?" चा बागुलबुवा जास्त भीतीदायक वाटु लागला होता. कॅरममधला 'एन्थू' त्यामुळे कमी झालेला...

प्लेसमेंट ऑफ़िस आता लॅब आणि होस्टेलइतकंच रेग्युलरली जायचं ठिकाण झालं होतं!

सप्टेम्बर आला.

आता फ़क्त तीन महिने राहिले होते! माझा प्रोजेक्ट सरप्राइझिंगली रन झाला होता! त्यावर आता EMG रेकॉर्ड व्हायला लागला होता. पण अजुन noise खुप होता आणि सेन्सरचं काम पुष्कळ बाकी होतं. पण मेन सर्किट रन झाल्यामुळे माझा प्रोजेक्ट ए़क्स्टेण्ड व्हायची शक्यता कमी होती. गरज वाटलीच तर माझे प्रोफ़ेसर पूढच्या बॅचच्या कुणालातरी माझं काम कन्टिन्यु करायला सांगणार हे मला माहित होतं! पण प्रोजेक्ट रन झाल्यामुळे आनंद व्हायच्याऐवजी मी मात्र मनातल्या मनात चिंतित झालो होतो! आता इथून बाहेर पडणं नक्की झालं होतं आणि 'पुढे काय?' चं उत्तर सापडत नव्हतं! प्लेसमेण्ट्ला येणार्या आणि मी होपफ़ुल असणार्र्या बहुतेक कंपन्यांची प्लेसमेण्ट होउन गेली होती पण मी त्यात जॉब मिळवु शकलो नव्हतो!

बायोमेडिकल साठी "Wipro GE Medical Systems" येणार अशी आमच्या प्लेसमेंट ऑफ़िसला नोटिस लागली आणि मला प्रचंड आनंद झाला! माझं सगळं बॅकग्राउंड ह्या कंपनीसाठी आयडियल होतं! डेट अजुन लागली नव्हती पण मी तयारीला जोमाने सुरूवात केली आणि रोज लक्ष ठेवू लागलो. विप्रोच्याआधी एक दोन अजुन कंपन्यांचे इंटर्वियु होते आणि मी अजुन आशा सोडली नव्हती! आय आय टी मध्ये सगळ्यात महत्वाची हीच गोष्ट शिकलो होतो - खरोखर मरेपर्यन्त - Never say die! :-)

<<तीन आठवड्यांनंतर>>

रविवार. सन्ध्याकाळचे सहा. H1 चा लाऊंज. मी अभीला भेटायला गेलो होतो. मी खरंच किती डेस्पेरेटली जॉब शोधतोय हे माहित असणारा कदाचित एकच मित्र. अभ्याने मस्त लांब 'वामकुक्षी' काढली होती!
चहा घ्यायला हा येणार हे मला माहित होतं आणि मी नेहमीप्रमाणे त्याची तिथे वाट बघत बसलो होतो!
चहाचा 'ग्लास' घेउन अभ्या लाउंजमध्ये आला.

मी टाइम्स वाचत बसलो होतो.

अभी आला आणि न राहावुन मी बोललो.

एकच शब्द.

"MBT!"

त्याच्या चेहर्यावरचे बदलते हावभाव अजुन आठवतात. तो दोन पावलं मागे गेला, कुठेतरी कोपर्यात त्याचा चहाचा ग्लास ठेवला आणि "बाबा... सही!!!" म्हणत मला मिठी मारली!!

त्या क्षणापर्यंत माझा स्वत:चाच विश्वास बसत नव्हता त्या बातमीवर!

दोन दिवसापुर्वी MBT ची written झाली होती.

तीन प्रश्नपत्रिका. नव्वद प्रश्न. साठ मिनिटे. दीडशे विद्यार्थी.

नेहमीप्रमाणे ह्या वेळीही मी चांगला पेपर दिला असं मला वाटत होतं पण खात्री नव्हती कारण ह्या आधी TIL, CITIL, INFY वगैरेंच्या परीक्षासुद्धा मला चांगल्या गेल्या असंच मी समजत होतो पण त्या क्लिअर झाल्या नव्हत्या!

शनिवारी सन्ध्याकाळी परीक्षा झाली आणि मी माझ्या कामाला लागलो.

सेन्सरचं काम अजुन पुष्कळ बाकी होतं. एक नवं टेक्निक डोक्यात होतं. एका सोनाराकडुन मी चांदीचे इलेक्ट्रोड बनवुन घेतले होते. आपल्या त्वचेचा electrical resistance बराच जास्त असल्याने इलेक्ट्रोडची conductivity अतिशय चांगली हवी. म्हणुन चांदी. त्यासोबतच ग्रिपसूद्धा. त्यासाठी मी एका चांभाराकडुन एक अगदी सॉफ़्ट लेदरचा बेसही बनवुन घेतला होता. आता ते चांदीचे इलेक्ट्रोड त्या लेदर बेसवर फ़िट करून त्यांच्या वायर्स माझ्या सर्किट्ला जोडायचा माझा आटापिटा चालला होता!

ती रात्र मी बराच वेळ लॅबमध्ये काम करत बसलो होतो. रात्री उशिरा रुमवर जाउन झोपलो. आता नक्की आठवत नाही कोणी (बहुधा भाय!) पण रविवारी सकाळी कुणीतरी मला खबर दिली की MBT ची written क्लिअर केलेल्यांची लिस्ट लागलिये आणि त्यात माझं नाव आहे. मी उडालोच. परीक्षा देउन मी नेहमीप्रमाणे धरून चाललो होतो की माझं नाव लिस्ट्वर नसणार. आता माझी तारांबळ उडाली. Written clear म्हणजे आता interview. म्हणजे फ़ॉर्मल्स. टाय. पॉलिश केलेले शुज. नशीब मी ती तयारी करून ठेवलेली. यदाकदाचित वेळ आलीच तर असं म्हणुन! सुदैवाने वेळ आली होती!

पण टाय बांधायचा कसा? आयुष्यात कधी टाय घालायची वेळ ह्यापुर्वी आली नव्हती!

सैफ़!

सैफ़ची आठवण आली. त्याला टाय बांधता येतो हे मला माहित होतं. त्याला पकडलं. सैफ़ने टाय बांधता बांधता २-४ फ़ंडेज दिले - "ढंगसे जवाब देना! Be confident. You can do it."

मी काही न खाता तसाच पळालो - थेट प्लेसमेंट ऑफ़िस! माझा नंबर ११:३० ला होता पण आला १:०० ला! पोटात अन्नाचा कण नाही! पण मला फ़िकिर नव्हती. छातीत प्रचंड धडधड. पूर्ण दोन तास. दीडशे पैकी ४० कॅन्डिडेट्स shortlist झाले होते. इन्टरव्यू संपला. आता अजिबात लक्षात नाही की काय बोललो मी त्यामध्ये. पण मी व्यवस्थित उत्तरं देत होतो आणि आमचं discussion अर्धा तास चाललं एव्हढं मात्र खरं!
इन्टरव्यु संपला तेव्हा मनात एक आशा उमलली होती - This may be it! पण शंका होतीच!

त्यानंतरचे ५-६ तास मी लॅबमध्ये PC समोर घालवले. माझा सेन्सर समोर पडला होता पण मी खुप अस्वस्थ होतो ते काम करायला. ५ ला मी लॅबमधुन बाहेर पडलो. प्लेसमेंट ऑफ़िस होस्टेलच्या रस्त्यात येतं पण त्यादिवशी मुद्दाम त्याला वळसा घालुन होस्टेलकडे निघालो. मी प्लेसमेन्ट ऑफ़िस क्रॉस केलं असेल नसेल तितक्यात माझा एक होस्टेलमेट (आणि भायचा एक सोम्या!) प्लेसमेन्ट ऑफ़िसकडुन धावत आला.

"ठाकूर... ठाकूर... congrats दोस्त! तेरा नाम लगा है MBT की फ़ायनल लिस्ट में!"

मी एक क्षणभर स्तब्ध झालो! माझा विश्वासच बसला नाही!

"थॅंक्स!" बोललो मी त्याला पण त्याने ते ऐकलं की नाही मला माहित नाही कारण तोवर मी प्लेसमेंट ऑफ़िसकडे धावत सूटलो होतो!

ज्याने माझं नाव त्या बोर्डवर लिहिलं त्याचं अक्षर खूप सुंदर नसेल कदाचित पण माझं नाव त्यापूर्वी मला इतकं सुंदर कधीच वाटलं नव्हतं! तिथुन मी निघालो तो एखाद्या 'zombie' सारखाच! सरळ H1 गाठलं!

अभ्याचं "बाबा.... सही!!!!!!!!!!!" आठवलं की आजही एकदम सही वाटतं!!

PS: त्या दिवसानंतर कॅरम खेळायला परत एकदा मजा यायला लागली!

PS2: माझा सेन्सर पूर्ण झाला आणि मी खर्या माणसांवर त्याची टेस्टसुद्धा घेतली.

PS3: भायसोबत आजही मी रोज मेल्स ए़क्स्चेंज करत असतो आणि अभीसोबतसुद्धा!

PS4: भाय, सैफ़, अभी ह्या सगळ्यांना मी नंतर 'चक्रा' मध्ये पार्टी दिली!

PS5: विप्रो जी ई त्या वर्षी प्लेसमेंटसाठी आलीच नाही!

5 Comments:

Anonymous Anonymous said...

ghati main kaiko likha ?? mereko kya chamkegaa ?? ghantaa ???

Thursday, September 28, 2006 1:52:00 pm  
Blogger सर्किट said...

This comment has been removed by a blog administrator.

Thursday, September 28, 2006 2:35:00 pm  
Blogger सर्किट said...

Yes, I still remember.. H1 च्या लॉंजच्या (एण्ट्रन्स जवळच्या पहिल्या) दारातून तू आत आला होतास, आणि तुझा फ़ेव्हरेट उभ्या ऑरेंज मरून स्ट्रिप्स चा शर्ट घातलेला होतास! युवर जॉब इन एम.बी.टी. वॉज व्हॉट अ रिलिफ़! :-)

त्या दिवसांत काही चांगलं व्हायला लागायची ती सुरुवात होती कदाचित..

मस्त लिहिलयेस पोस्ट. प्रवराच्या B.E. रिझल्ट नंतर, IIT-B मधला प्लेसमेण्ट चा दिवस! makes the sequence correct.

जमल्यास भारतातून पुढचे पोस्ट लिही.. ;-)

Thursday, September 28, 2006 2:36:00 pm  
Blogger Gayatri said...

:) छानच. 'पुढे काय होणार' ची उत्सुकता ताणून धरली गेली होती MBT चा उल्लेख होईपर्यंत! :D

तुमच्या प्रतिक्रियेबद्दल आभार, आणि दिवाळीच्या शुभेच्छा!

Friday, October 20, 2006 7:09:00 am  
Blogger Jayant said...

Sahi..re..baba tu chukun kanpitar mistri zalas..tu lekhak zala astas tari sahaj khapla aastas..so short and sweet.."great Blog" roj ek blog wachayache tharwle aahe so see u tomorrow..

Wednesday, June 27, 2007 4:37:00 am  

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home