Wednesday, November 01, 2006

रिमेकच्या जमान्यात माझे प्रतिनिधी!


आज मामाच्या ब्लॉगवरचा डॉनचा उल्लेख वाचुन रिमेक्स चा विषय डोक्यात घुसला.
जनता ज़र रिमेक्स बनवतेच आहे तर हे लोक इतका नतद्र्ष्ट्पणा का करताहेत हे मला समजत नाही!

अहो, ज़र तुम्हाला कुणी म्हणतंय की भूतकाळात जा आणि हवा तो क्रिकेटर बन तर हया लोकांची मजल रवि शास्त्री, रॉजर बिन्नी आणि ख्रिस ब्रॉडच्या पलिकडे जात नाहीये!

डॉन ब्रॅड्मन, गॅरी सोबर्स, रोहन कन्हाय, क्लाईव लॉइड, रिचर्डस, गावस्कर, कपिल देव मेलेत का??

आय मीन खरोखर एखाद दोन टपकले असतीलही पण भूतकाळात जाल तेव्हा होतील की जिवंत!

ज़रा नजर ऊन्ची रख्खो ना यार!

रिमेक्सच करायचेत लोकांना तर हया लिस्ट वर विचार व्हावा -
१. आनंद: ओरिजिनल आनंदमधल्या आनंदच्या जागी आमिर खान आणि बाबु मोशायच्या भुमिकेत अभिषेक बच्चन . मुरारिलाल राजपाल यादव किंवा परेश रावल.

२. चुपके चुपके: धर्मेन्द्र - अक्षय, अमिताभ - अभिषेक, जया - राणी, शर्मिला - ऍश, ओमप्रकाश - परेश रावल.

३. दो बिघा ज़मीन: बलराज साहनी - आमिर खान

४. अर्धसत्य: (ओम पूरी ऎवजी कुणाला घेणार? अजय देवगण बहुतेक!)

५. तीसरी कसम: सगळ्यात महत्वाचं म्हणजे गाणी जमायला हवीत. भूमिका: राज कपूर - गोविंदा, वहिदा रेहमान - ऍश.

६. विक्रम गोखले, सविता प्रभुणे, अशोक सराफ़ आणि बच्चू आणि छकुली हे दोन बालकलाकार ह्यांचा एक सुन्दर मराठी पिक्चर आहे - आठवला - कळत नकळत!

भुमिका: विक्रम गोखले - संजय दत्त, सविता प्रभुणे - राणी, अशोक सराफ़ - अर्शद वारसी.

७. सरकारनामा

यशवंत देव - मोहन जोशी, त्याचा 'सत्कार' करणारा माणुस - चायना गेटचा विलन 'जगीरा', दिलिप प्रभावळ्कर - दिलिप प्रभावळ्कर, अजिंक्य देव - अभिषेक, खेडूत विलन - अजय देवगण.

८. ३६ घंटे!

९. तेरे घर के सामने (ओमप्रकाशच्या भुमिकेत परेश रावल ला घेउन + ए आर रहमान ला चॅलेंज करून की हिम्मत है तो ओरिजिनलसे मेलोडियस गानें बना के दिखा!)

१०. जाणता राजा (एक trilogy लागेल पण चालेल!) शिवाजी महाराज शोधावे लागतील!

मी सगळ्यांच्या कॉमेण्ट्सची वाट पाहतोय! :-)

5 Comments:

Blogger सर्किट said...

खरंय! पण मी म्हणतो करावेत कशाला रिमेक? सैगल चा देवदास दिलीप ने पुन्हा केला तोच एकमेव आवश्यक असा रिमेक होता, बाकी एकही नाही. (किशोरच्या एका सिनेमाचा संजीवने केलेला अंगूर ही छान होता.) पण ज्याच्यात "औकात" असेल त्यानेच रिमेक करावेत आणि दाखवून द्यावं, की ओरिजिनल टीम पेक्षा आमच्या टीम मध्ये जास्त अपील आहे.. आणि जर औकात नसेल तर गप पडावं, नाहीतर रिमेक करणाऱ्याचंच हसं होतं.

(बाबा, ऍश म्हणे की तिला वाटलं तुझ्या भारतयात्रेबद्दल लिहीलंयंस की काय ब्लॉग मध्ये.)

Wednesday, November 01, 2006 9:48:00 pm  
Blogger Abhijit Bathe said...

Baba -
I dont agree with you!
Remake needs an inspiration. Yeah, we liked A,B,C - and they were great, but if I am more touched by say 'Ijazat' and decide to remake it (maybe with a completed 'maazi ko maazi na rehne diya to...'), with my take on it - why not?
Who are you to judge me then?
Take a case of 'Ijazat' -
I dont know if someone will remake it or not, but here is the thing - have you ever wondered?
1) what if Sudha had returned to Mahen?
2) What if Maya hadnt died?
3) What happened to Shashi and Sudha when they left the station?
4) What if Sudha hadnt found those 'lipstick ke daag'?
5) What if Mahen and Maya had got married?

These and 'n' other questions.....
Its not like we never think of other options than what we are served in a movie, its just that we are unable to do anything about it other than think. Farhan being a director, went ahead and remade a movie the way he thought it should have been / could have been - just the way you would rewrite/ammend a code or me rebuilding/redesigning a foundation.

Why the fuck should I judge your code or you judge my design? Its your and my take at something.

Friday, November 03, 2006 6:45:00 pm  
Blogger सर्किट said...

बरोबर आहे मामा तुझं. कला (आर्ट) कशी, कशाबद्दल सादर करावी हा प्रत्येक कलाकाराचा हक्क असतो. कुणी कलेवर बंधनं घालू नयेत. उद्या माझ्या मुलानी फ़ोटोत बघून मोनालिसा चं चित्र त्याच्या ड्रॉइंग-बुक मध्ये काढायचं ठरवलं, तर साहजिकच मी त्याला थांबवू नये..

पण असा विचार कर की कलाकार जे बनवतो त्यावर मत व्यक्त करण्याचा रसिकांनाही हक्क असलाच पाहिजे! चित्र खराब आलं तर आपण सांगणारच. अनु मलिक 'देखो बारिश हो रही है' वर बेसूर गायला की आपण त्याचा बाप काढणारच! तसंच वर्षानुवर्षे मनात 'डॉन' ह्या बच्चन ने अजरामर केलेल्या 'क्लासिक' ची जी मेमरी आपण मनात जतन केलेली असते त्याचा फ़रहान आणि शाहरूख सारख्या पोराटोरांनी चुराडा केल्यावर राग व्यक्त करण्याचा हक्क ही आपल्याला आहेच.

मुलाने काढलेलं मोनालिसा पाहिल्यावर त्याने काय चित्र काढलेलं मला पहायला आवडलं असतं हे जसं मी एक रसिक म्हणून सांगू शकतो, तसं कोणत्या सिनेमांचे रिमेक पहायला आवडले असते हे बाबा ही सांगू शकतोच.

लोकशाहीचा विजय असो! ;-)

Saturday, November 04, 2006 8:07:00 am  
Blogger Tulip said...

खरं तर ज्या दिग्दर्शकाकडे आपली स्वत:ची क्रिएटिविटी, स्टाईल, sensibility ह्या बरोबरच स्वत:ची अशी different interpretations वापरण्याचे धाडस असेल त्यानेच रीमेक्स च्या वाटेला जावं. ( इजाजत च्या बाबतीत अभिजीत म्हणतोय त्याप्रमाणे वेगळी interprtations ). else it's sheer waste of time, energy and resourses if yu just gonna 're-tell' a story. . I mean then why remake something that's already great and classique if yu are making it frame by frame? फ़क्त actors बदलून तेच संवाद, तशीच पटकथा, तशीच किंवा त्याच प्रसंगात गाणी वापरली तर काय अर्थ आहे त्या रीमेक ला? खटाटोपच व्यर्थ आहे जर तुमच्या कडे स्वत:च असं वेगळ काही सांगण्यासारख नसेल. कोणीही उठेल आणि जरा बरे actors घेऊन रीमेक्स काढतील. उमराव जान, गाईड, साहिब बिबी, चौदहवी का चांद.. लीस्ट already तयारच झालीय की. .
देवदास किंवा परिणीता रीमेक म्हणून यशस्वी झाले असं म्हणतात तरी त्यात दिग्दर्शकांनी स्वत:चं असं किती वापरल? फ़क्त अधीक रंगीत, झळझळीत वगैरे बनवण्यापलीकडे. ( मोगले आझम रंगीत करण्या सारखेच मे बी. ) किंवा हॉलिवुड जसे foreign films ना उचलून त्याचे american audiences साठी त्याना रुचणार्‍या चवीचे 'रीमेक्स' बनवते तसाच प्रकार. Refer Argentinean film Nueve Reines चा रीमेक criminal किंवा Abre Los Ojos ह्या सुंदर spanish film चा काढलेला Tom Cruse चा Vanilaa Sky.

ते धाडस फ़रहान ने थोड तरी दाखवल म्हणायला हरकत नाही. पण तरी part tribute to the original team, part new introductions for younger audiences, part bold experiments ह्या सर्वाचा तोल राखण्याचा प्रयत्न करताना त्याचा गोंधळ उडाला and the result's disastrous.

हिमांशू ने दिलेली लीस्ट अशी अनेक क्लासीक्स ची नावे ग्रेट actors देशी विदेशी घेऊन वाढवता येईल. पण असे remake कायमच mercilessly rip-off केले जातील जोपर्यंत त्यात वेगळ्या interpretations च्या value additions केल्या जाणार नाहीत. characters, diologues, songs हे सर्व मनावर कोरल गेलेल असतं. nostalgia पुसण शक्य नसतं. performance based movies मनावर त्यातल्या characters चा अमीट ठसा उमटवून जातात. तो पुसणे अवघड नव्हे बरेचदा अशक्यच असते. वेगळी, क्रीएटीव इंटरप्रिटेशन्स नसतील तर रीमेक बनवूच नयेत.

Saturday, November 04, 2006 7:52:00 pm  
Blogger himan8pd said...

हा (सं)वाद छान चाललाय एकूण!

आपली प्रत्येकाची 'रिमेक' पासूनची एकूण अपेक्षाच वेगळी आहे असं म्हणायला हरकत नाही.

मामा - तू जे म्हणतो आहेस ना की इजाज़त मध्ये जे घडताना दाखवलंय त्याचे वेगळे पर्याय, वेगळी स्टोरी आणि वेगळा अंत - थोडक्यात स्वत:ला हवी तशी स्टोरी बनवून दाखवणं - ही तुझी रिमेकची कल्पना आवडली पण इजाज़त पेक्षा अशी कल्पना मला एखाद्या 'साय-फ़ाय' मूवीमध्ये implement करायला आवडेल! Alternative stories will be shown with audience deciding what they want to happen next! Something like KBC audience poll!

इजाज़त सारख्या ठिकाणी तू म्हणतोयेस तसं काही केलं तर जो पिक्चर तयार होईल त्याला इजाज़त म्हणता येईल का ह्या बद्दल मी साशंक आहे. माया ज़र मेली नाही तर, सुधा ज़र परत आली तर काय होईल ह्याचे दुसर्या कुणाचे interpretation ही एक नवी कथा होईल - "स्वैर अनूवाद" किंवा अनू मलिकच्या चोरीला "इन्स्पिरेशन" चं नाव देण्याच्या पठडीतली! अनू मलिकचा उल्लेख इथे थोडा controversial वाटेल कुणाला कदाचित पण शेवटी एखाद्या classic ला आपल्याला आवडेल तसं adapt करुन घेण्याला अजून काय म्हणता येईल.

डॉन मध्ये फ़रहान confused आहे हे तर स्पष्टच आहे. उदा.

१. ज़र डॉनने स्वत:च एक खोटी DVD बनवलीये डीसिल्वाला फ़सवण्यासाठी तर एकदा पोलिसांच्या तावडीतून सही सलामत सूटल्यानंतर तो उगाच परत त्या blank DVD साठी आटापिटा का करतो? He can simply disappear to confirm the punch line - डॉनको पकडना मुश्किलही नहीं नामुमकिन है! :-)

२. डॉनला 'दिपू'शी काय घेणं देणं? परत दिपूच्या बापाकडे (जसजित) बद्दल त्याला काहीच माहित नाही - मग तो त्या दोघांचा पाठलाग का करतो?

Such things show that Farhan is confused about who is playing the character - Don or Vijay?!

आता मी माझी लिस्ट का दिली ह्या विषयाबद्दल -

फ़िल्म मेकिंग हे असं एकच माध्यम आहे जे 'कालातीत' आहे. पिक्चर बनवताना ते contemporary असावं अजिबात नाही! जर तुम्हाला एखादी जुनी कादंबरी, फ़िल्म, गोष्ट किंवा एखादं जुनं नाटक आवडलं तर तुम्ही ते पुन्हा साकारु शकता! You can turn the clocks back and do things again!

पण अर्थातच जेव्हा तूम्ही असं करण्याचा निर्णय घेता तेव्हा आपली गाठ "ओरिजिनल" शी आहे हे लक्षात ठेवुनच तुम्ही तो घ्यावा.

माझ्या मते मात्र - रिमेकच्या वाटेला जाण्यापेक्षा - नवी कथा शोधुन, नवे कॅरेक्टर्स बनवुन संपूर्ण स्वत:ची अशी "ORIGINAL CLASSICS" बनवण्यात खरा पुरुषार्थ (with due apologies to tulip for a chauvinist term, मला खरंच दुसरा शब्द सुचत नाहिये!) आहे!

फ़रहान भविष्यात लक्षात राहिल तो त्याच्या 'दिल चाहता है' साठी.

'डॉन' साठी डोक्यात येतील अमिताभ, सलिम-जावेद आणि हेलनच!

शाह रुख, फ़रहान आणि करीना नव्हे!

इति.

Sunday, November 05, 2006 11:50:00 am  

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home