Sunday, November 05, 2006

सोनू निगमचा कभी अलविदा...

तुमको भीss है खबssर
मुझको भीss है पताss
हो रहाss है जुदाss
दोनों काss राsस्ताs

दूssssर जाssके भी मुझसे
तुsssम मेरीss यादों में रहना

कभी अलsविदा ना कहना...
कभी अलsविदा ना कहना...
कभी अलविदा ना कहना...

फ़ार वर्षांनंतर एखादे गाणं इतकं आतपर्यंत भिडलं असेल... शब्दांपेक्षाही सोनु निगममुळे! गेली कित्येक वर्षे सोनु निगमला ऐकतोय. रफ़ीच्या जवळपास जाणारा आजच्या काळातला एकमेव गायक. पण ह्या गाण्याने सोनु निगम अचानक ढांगा टाकत दोन चार जिने चढुन रफ़ीच्या अगदी शेजारी जाऊन पोचल्यासारखा वाटला. पहिल्या चार ओळी पहिल्यांदा सोनू गातो तेव्हा बॅकग्राऊंड्ला म्युज़िक जवळजवळ नाहीच! तरीही कुठेही बेसूर न होता, लय न चूकता आणि अतिशय भावगर्भ् आवाजात सोनुने ह्या ओळी गायल्यात. सूरेख!

अलका याग्निक ह्या गाण्यात त्याच्या पासंगालाही पुरली नाहीये! तिचा आवाज ऐकायला गोड वाटतो पण त्यात सोनूच्या गायकीतला 'गाणं आतुन आल्याचा' भाव जाणवत नाही. तिच्या ओळी कुठेही बेसुर नसुनही 'कोरडया' वाटतात. किंबहूना अलकाला 'भाव' न सापडल्यामुळे सोनु जास्तच 'भाव' खाऊन जातो!

करण जोहर, आदित्य चोप्रा आणि यश चोप्रा ह्या त्रिकूटाला बाकी काहीही दोष द्या पण ह्या लोकांनी हिंदी गाण्यातली जूनी 'मेलडी' टिकवुन ठेवण्यात गेल्या दोन दशकांत बरंच contribution दिलंय एवढं क्रेडिट ह्यांना द्यावंच लागेल!

बाय द वे, मामा, तु इजाज़त जसा स्वत:च्या बदलांसकट बनवायचं म्हणतो आहेस ना, तसा हा 'कभी अलविदा ना कहना' करणने यश चोप्राच्या सिलसिलावर बेतलाय आणि स्वत:च्या बदलांसकट सादर केलाय. पण त्याने तो इतका बदललाय की सहजासहजी ही गोष्ट ध्यानात येत नाही! What say?

बाकी पिक्चरमध्ये काहीही आवडो न आवडो पण त्यात करणने खूप मेहनत केलिये ही गोष्ट निर्विवाद.
छोट्या छोट्या गोष्टी - 'रॉक ऍण्ड रोल सोनिये' च्या शेवटी अमिताभची 'मायाs' हाक आणि नंतरचं छोटंसं लेक्चर. हो, ते फ़िल्मी आहे पण ते लेक्चरच कथानक पूढे घेउन जातं.

अभिषेक, राणी आणि अमिताभचं नातं...

अभिषेकचं राणीला शेवटी अमिताभचा एक सुंदर फोटो देणं...

किरोन खेरचं प्रिटीसोबत राहणं आणि प्रिटीचंदेखिल मोठ्या मनाने तिला सामावुन घेणं...

पिक्चरची एकूणच हाताळणी संवदेनशील आहे आणि त्याचा परिणाम होतोच. आणि म्हणुनच मला वाटतं की करन जोहर सारख्या ताकदीच्या दिग्दर्शकाने कथानक थोडं सांभाळुन निवडावं. कमिट्मेण्ट नसतानाही लग्नाच्या बेडीत अडकुन नंतर त्यातून सुटताही येतं असं विचित्र आणि धोकादायक चित्र ह्या पिक्चरमधुन उभं राहतं. मला वाटतं हे अतिशय चूकीचं आहे. मी स्वत: कॉलेजच्या दिवसांत पिक्चर पाहून किती influence व्हायचो हे आठवल्यावर तर मला जास्तच काळजी वाटते! एखादा तरूण किंवा तरूणी असा पिक्चर बघून ज़र लग्नाबाबत - No big deal, if it doesn't work out I'll look for someone else - असा समज करुन बसला/ली तर? विचार करून कांटा येतो अंगावर!

बोहल्यावर बसलेल्या नवरदेवाच्या आणि नवरीच्या मनांत काय चालू असतं आणि त्यांचं आयुष्य त्या एका दिवसाने किती प्रचंड बदलतं हे स्वत: त्यातुन न गेलेल्या करणला कोण आणि कसं समजवणार?
शादी का लड्डु खाके तो देखो करण बाबू - फ़िर एक और 'कभी अलविदा ना कहना' बनाना - it will be interesting to watch how your perspective changes!

But the bottomline is - Sonu Nigam has given one of his best performances in the title song! मज़ा आ गया सुनके!

5 Comments:

Blogger सर्किट said...

पिक्चर पहाण्याच्या आधी ऐकलं होतं हे गाणं तर मलाही खूप आवडलं होतं.. पण पिक्चर पाहिल्यापासून जी तोंडाची चव गेली, तर आता ऐकवत नाही.. ऐकताना आता ते पिळपिळ गळे काढणारे शाहरूख आणि राणी दिसतात!

सोनू ने अतिशय आर्ततेने गायलेलं 'दिल चाहता है' मधलं "तनहाई...", आणि 'परदेस' मधलं "दिल..ये दिल..दीवाना.." ही मस्त होते!

Monday, November 06, 2006 10:11:00 am  
Anonymous Anonymous said...

baba, sadhya B&B madhye ekatach rahato ahes na, tar blog lihi na jara jasti. ki ekata asunahi vel milat nahiye tula? :-O

Thursday, November 16, 2006 12:48:00 am  
Blogger Abhijit Bathe said...

आई शपत बाबा - या पोस्ट ला मी कमेंट कशी काही दिली नाही? आज बऱ्याच दिवसांनी हे वाचत इथं आलो आणि मीच काय म्हटलं असेल यावर अशी उत्सुकता वाटली. परवाच आमची (पहिली) ऍनिव्हर्सरी झाल्याने लग्नाने किती (किती) फरक पडतो हे एका क्षणात डोळ्यांसमोरुन तरळुन गेलं. Did I ever tell you that me and Madhuri loved this movie? मे बी हे चोप्रा-जोहर लोकांबद्दलच possible आहे - either u love a particular movie or u hate it. पिक्चर पाहुन बरेच दिवस झाले, पण आज (परत) हे पोस्ट वाचताना तु सांगितलेल्या त्यातल्या संवेदनक्षम जागा - पर्फेक्ट आठवल्या.

अभ्या - परत एकद ट्राय कर हा पिक्चर. मला पण DTPH तद्दन फालतु वाटलेला पहिल्यांदा पाह्यलेला तेव्हा. (मे बी मन्या सोबत पहात होतो त्यामुळे असेल!:))))))))

Wednesday, May 23, 2007 12:24:00 am  
Blogger सर्किट said...

ha..ha..haa..:-D kay manoranjak drushya aahe.. mama ani manya, hatat haat ghalun, pravara chya ekhadhya video hall la, 1st day, 1st show pahat basalet - DTPH cha. ;-p

Wednesday, May 23, 2007 8:57:00 am  
Blogger himan8pd said...

mama, tujhi comment kaLayala malaa punhaa ekda maajhach blog wachawa lagalaa!! Why am I not surprised that you and madhuri liked the movie?? :-)

Thursday, May 24, 2007 8:17:00 pm  

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home