Sunday, December 03, 2006

एका घराची गोष्ट

असेच एकदा बाणेर रोड वरुन आम्ही एक साइट शोधत जात होतो. त्यावेळी आम्हाला अगदी रस्त्यावरच दूसरी एक साइट दिसली. त्यातली एक १० मजली इमारत जवळजवळ पुर्ण झाली होती आणि अजुन एक बिल्डिंग बनत होती....

नेहमीप्रमाणे गाडी लावुन आम्ही साइट ऑफ़िस शोधलं. पूर्ण झालेल्या इमारतीच्या बाजुला आणि नुकत्याच बांधकाम सुरू झालेल्या इमारतीच्या बरोबर समोर साइट ऑफ़िसची तात्पुरती एकमजली चाळवजा शेड होती. शेडची सजावट मात्र सुरेख होती. समोर एक सुंदर कारंजा. आत AC. पिण्याच्या पाण्यासाठी कूलर. खाली स्पार्टेकचं फ़्लोअरींग. एकुण त्या शेडचं शेड असणं जितकं लपवता येईल तितकं लपवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता!

गेल्या गेल्या तिथल्या एका माणसाने आमचं तोंडभरुन स्वागत केलं. काचेच्या दोन पेल्यांत स्वच्छ आणि थंडगार पाणी आणुन ठेवलं. इतक्या उन्हातुन गेल्यावर थंड पाणी पिण्यासारखं दुसरं सुख नाही! :-) तिथला मॅनेजर आम्ही पोचलो तेव्हा फोनवर होता. तो रिसिव्हरवर हात ठेवुन आम्हाला आधी 'सॉरी' म्हणाला. आम्हाला पाणी ज्याने आणुन दिलं होतं त्या तिथल्या माणसाला (त्याचं नाव आता आठवत नाही, आपण त्याला गणेश म्हणु या.) त्याने आम्हाला 'सॅम्पल फ़्लॅट' दाखवून आणायला सांगितलं. आणि आमच्याकडे वळुन -

'सर, आप लोग फ़्लॅट देखकर आइये, in the meanwhile, let me finish me the call. Please excuse me.' असं अगदी पोलाइट्ली बोलला.

त्याचं वागणं मला आवडलं. आम्ही दोघं गणेश सोबत सॅम्पल फ़्लॅट बघायला निघालो. हा फ़्लॅट कमी बांधकाम झालेल्या इमारतीत होता. विटांच्या राशी, सिमेंट्च्या गोण्या, बाकीचा बांधकामाचा कचरा अश्या सगळ्या गोष्टी चुकवत आम्ही पहिल्या मजल्यावरच्या त्या फ़्लॅटमध्ये (एकदाचे) पोचलो...

"Wow! Amazing!! This is fantastic!!!" माझी पहिली प्रतिक्रिया. मनात.

माझी आणि शुभांगीची नजरानजर झाल्याझाल्या मला कळलं की आमची दोघांची प्रतिक्रिया अगदी सेम होती. वरकरणी मात्र आम्ही दोघेही काही बोललो नाही. कारण? एखाद्या गिर्हाइकाला फ़्लॅट आवडलाय म्हटल्यावर बिल्डरचा माणुस लगेच भाव वाढवायची शक्यता नाकरता येत नाही! आम्ही फ़्लॅट्च्या दारात उभे होतो. समोर प्रशस्त हॉल होता. हॉलचं सिलिंग एखाद्या शोरूमसारखं दुमजली उंच होतं. मधोमध एक सूंदर झूंबर लावलेलं होतं. हॉलच्या पलिकडे हॉलइतकीच प्रशस्त टेरेस होती. उजवीकडे हॉलला लागुनच डायनिंग. डायनिंगच्या पलिकडे किचन. किचनला लागुन एक ड्राय बाल्कनी. किचनच्या दाराच्या डावीकडे एक काऊंटर वॉश बेसिन. त्याच्या पलिकडे वरच्या मजल्यावर जाण्यासाठी जिना. मी भारतात प्रथमच डुप्लेक्स पाहत होतो. जिन्याच्या पलिकडे बाथरूम आणि अगदी शेवटी, टेरेसला लागुन एक प्रशस्त बेडरुम.

The design was perfect. It all fitted so nicely in that space.

एकूणच त्या घराचा 'लूक' अगदी ग्रॅण्ड होता.

शुभांगीच्या डोळ्यात 'हिमांशु, प्लीज, मला हेच घर हवं!' मला स्पष्ट वाचता येत होतं! ती त्या घराच्या प्रेमात पडली आहे हे मला लगेच कळलं! आणि तिच्या इतकाच त्या घराच्या मीसुद्धा प्रेमात पडलो होतो! :-)

वरच्या मजल्यावर जिन्याच्या लॅंडीगवर लगेचच एक खिडकीवजा मोकळी जागा होती. तेथुन खालचा हॉल, टेरेस, मुख्य दरवाजा, सगळं वरच्या मजल्यावर राहुनच दिसत होतं. ती कन्सेप्ट मला प्रचंड आवडली!

It was so practical and so unique.

लॅंडींगच्या उजवीकडे खालच्याच मजल्यावरच्या प्लॅनची कॉपी होती. बरोबर खालच्या मजल्यावरच्या बेडरूमएव्हढीच दुसरी बेडरूम - with attached bathroom.

आणि लॅंडींगच्या दुसर्या बाजुला सगळ्यात मोठी मास्टर बेडरुम. मास्टर बेडरुमला लागुनच अजुन एक छोटीशी टेरेस! हे ही मला खूप आवडलं! मास्टर बेडरुममधुन दुसर्या बाजुला खालच्या मुख्य दरवाजाच्या बरोबर वर दुसरा दरवाजा होता. म्हणजे घराला दोन मुख्य दारं होती. आम्ही दोघेही तो फ़्लॅट बघुन जाम खुश झालो होतो.

It appeared as if the end of our six-month-long search was near...

फ़्लॅट बघुन आम्ही परत खाली गेलो तेव्हा आम्हाला कल्पनासुद्धा नव्हती की आमच्या पुढ्यात काय वाढुन ठेवलंय!

"मग, कसा वाटला सॅम्पल फ़्लॅट साहेब?" मॅनेजरचा कॉल एव्हाना संपला होता.

"आम्हाला फ़्लॅट तर चांगला वाटला. ह्या एरियात काय रेट चालुये सध्या?" मी खडा टाकुन पाहिला.

"बाणेर रोड तर आज काल एकदम हॉट एरिया झालाय. शिवाय आपली कामाची क्वालिटी तुम्ही पाहिलीच! रेट इथे १५०० च्या खाली नाहीच कुठे." मॅनेजर.

"बरं डुप्लेक्स कोण-कोणत्या मजल्यावर शिल्लक आहेत अजुन?" मी. १५०० मला रिझनेबल रेट वाटला. मी कोपर्या-कापर्यात २२०० भाव सांगणारे पाहिले होते त्यामुळे मी पण तसा निर्ढावलेला झालो होतो एव्हाना! :-)

"डुप्लेक्स? गणेश तुम्हाला बोलला नाही का की डुप्लेक्स नाहियेत शिल्लक म्हणुन? माफ़ करा पण डुप्ले़क्स सगळे आधीच बूक झालेत. आम्ही तो सॅंपल फ़्लॅट दाखवतो ते amenities दाखवण्याकरता. त्याचं काय आहे की 3BHK चा सॅंपल फ़्लॅट अजुन तयार नाहिये त्यामुळे असा गोंधळ होतोय." मॅनेजर ने आमच्या स्वप्नांवर एका फ़टक्यात पाणी फ़िरवलं!

"ओह नो..." आम्ही दोघंही!

"तुमची अजुन कूठे एखादी विंग होतेय का?" मी आशेचा शेवटचा किरण म्हणुन विचारलं.

"सॉरी. ही शेवटची बिल्डिंग. अहो पण डुप्ले़क्स नाही मिळाला तर काय झालं. 3BHK आहेत की अजुन. तेही चांगले आहेत." मॅनेजर ने आम्हाला दाखवायला प्लॅन्स काढले.

"..." आम्ही काहीच बोललो नाही पण आमची निराशा लपुन राहिली नव्हती. मॅनेजरला ते जाणवलं असावं.

"अहो, तुम्ही फ़क्त एक आठवडा उशीरा आलात. मागच्याच आठवड्यात एक पार्टी येउन टोकनचा चेक देउन गेली." मॅनेजरने माहिती पुरवली.

"ओह.." आम्ही दोघंही जाम अपसेट झालो होतो. स्वत:वरच. गेल्या सहा महिन्यात आम्ही त्या जागेवरुन कमीत कमी ४ वेळा गेलो असू. हा प्रोजेक्ट दिसला कसा नाही ह्या आधी??

टेबलवरचा फ़ोन वाजत होता...

"हॅलो" मॅनेजर.

इकडे मी माझ्याच विचारात मग्न होतो. How can I miss this site? It was bang on the road! Not even hundred feet inside. मी मनाशी खूणगाठ बांधली की इथुन पुढे असा निष्काळजीपणा अजिबात करायचा नाही. बारकाईने रस्ता आणि बोर्डकडे लक्ष ठेवुन गाडी चालवायची. अजुन एखादा ड्रीम फ़्लॅट हातुन असा जायला नकॊ. मला ते हातातुन काहीतरी मौल्यवान वस्तु सुटत असल्याचं आणि आपण काहीच करू शकत नसल्याचं फ़ीलिंग अजिबात आवडलं नाही.

मॅनेजर अजुन फ़ोनवर होता. मला मात्र तिथे अजुन बसवेना. मी उठलो.

नजरेनेच "आम्ही निघतो" ची खूण करत मी आणि शुभांगी तिथुन निघालो.

पण मॅनेजर काही ऐकेना. "अहो थांबा. एक मिनिट बसा. माझं बोलणं झालंच आहे." अश्या त्याच्या खाणाखुणा सुरु होत्या.

तो माणुस आमच्याशी खूपच चांगला वागला होता. त्याची एक छोटीशी रिक्वेस्ट मला नाकारता येईना.

शेवटी मी नाखुशीनेच परत बसलो.

"साहेब - शेवटचा डुप्लेक्स तुमच्याच नशिबात दिसतोय!" मॅनेजर फ़ोन ठेवता ठेवता बोलला.

मी चमकलोच!

"म्हणजे?" मी गोंधळुन विचारलं.

"अहो मागच्या आठवड्यात ज्यांनी हा फ़्लॅट बूक केला ना, त्यांना आधीपासुनच कॅम्पमध्ये घर हवं होतं! तिथे त्यांना मनासारखं काही मिळेना म्हणुन मग शेवटी त्यांनी आपल्याकडे डुप्लेक्स बूक केला. नशीब बघा. त्यांनी कॅम्पमधल्या घराची आशा सोडली आणि लगेच एकाच आठवड्यात देवाने त्यांना मनासारखं घर दिलं. कॅम्पमध्येच!

मॅनेजरने खुलासा केला.

"त्यांचाच फ़ोन होता. टोकनचा चेक परत कसा मिळेल त्याची चौकशी करत होते!"

माझा तर आधी विश्वासच बसला नाही.

"WOW! That's a great news!!" मी.

"माझा सल्ला ऐकाल साहेब तर जो काय निर्णय घ्यायचा तो लवकर घ्या. हा फ़्लॅट जास्तीत जास्त पुढच्या रविवारपर्यंत राहिल." मॅनेजर.

....

<<<<आज>>>>

आपलं घर सुद्धा आपल्या नशिबाचा एक भाग असतं!

जे, जेव्हा, जिथे नशिबात असेल तेच, तेव्हाच आणि तिथेच मिळतं!

हा किस्सा घडल्याच्या २४ तासांत मी टोकन चेक देउन हे घर बूक करुन ठेवलं होतं.

नंतर थंड डोक्याने विचार करुन, ४ अनुभवी लोकांचा सल्ला घेउन मी खरेदीखत केलं.

ह्या सुटीत भारतात त्या घरात राहायचा योग आला.

माझ्या सम्पुर्ण वास्तव्यात सतत मला ह्या घराची आणि माझी पहिली भेट आठवत राहिली.

वाटलं - हे घर मी नाही, ह्या घराने मला निवडलं!

आणि ते खरंच आहे.

१० दिवस ह्या घरात राहिलो तर मनाला कुठेतरी वेगळीच शांती लाभली. एक क्षणभरही कंटाळलो नाही. "सुकून" ह्या हिंदी/उर्दू शब्दाचा मराठी पर्याय मला आता सुचत नाहिये पण इथे राहुन मला नक्कीच सुकून लाभला.

हे घर आमचंच होतं.

आम्ही ह्या घराचेच होतो.

देवाने किंवा दैवाने - भेटलो ते फ़ार बरं झालं!

नसतो भेटलो तर कदाचित आयुष्यभर एक रूखरूख लागुन राहिली असती - अरे तो सुंदर डुप्लेक्स मिळाला असता तर?!