Thursday, February 08, 2007

ऍश, अभि आणि शिल्पा...

गेले दोन महिने जाम म्हणजे जाम बिझी आहे! श्वास घ्यायला वेळ नाहिये, ब्लॊग कुठुन लिहिणार... शेवटी इंद्राची आराधना केली तेव्हा प्रसन्न झाला देवांचा राजा - आणि आजचा हा दिन दिसला! आख्ख्या इंग्लडमध्ये स्नोफ़ॊलने धुमाकूळ घातलाय... सगळ्या मिटिंग्ज कॅन्सल्ड - ऑफ़िसला ऑफ़िशियली दांडी... म्हटलं देवाने दिलेल्या 'स्नोसंधी' ला गमावायला नको! :-)

चलो ब्लॉग लिखते हैं!

नेहमीप्रमाणेच जेव्हा तुम्हाला कॉमेंट करायला वेळ नसतो तेव्हाच काही मोट्ठाले इवेंट्स होउन जातात.
उदा. ऍश-अभीची ही नवी जुनिअर जोडी... अहो आपली आहे की अभिजित कुलकर्णी - अश्विनी कुलकर्णीची ओरिजिनल जोडी... हे अभिषेक-ऐश्व्रर्य़ा तर कालचे छोकरा-छोकरी! :-P

पण दोन्ही 'ऍश'नी चांगले 'अभि' गटवले बरं! :-)

'ऍश सिनियर' बद्दल अजुन जास्त काही लिहुन मला फ़टके नाही खायचेत पण 'जुनियर ऍश' को तो बॉस मान गये! क्या चॉइस है! मला वाटतं बच्चन्स आता भारतातलं सगळ्यात मोठं सेलेब्रिटी कुटुंब होणार आहे! अभि जरा चाचपडला सुरुवातीला (सिनियर नाही हो जुनिअर!)... पण आताशा त्याला चांगलाच सूर गवसलाय!

सरकार, बंटी और बबली, ब्लफ़मास्टर, गुरू, धुम १ आणि २, दस...

बर्याच पिक्चरमध्ये चांगला चमकलाय...

हो, कधी कधी त्या वाढलेल्या दाढीत आंघोळ न करता आल्यासारखा वाटतो खरा पण बाकी बर्याच बाबतीत त्याने बापाकडुन चार चांगल्या गोष्टी घेतल्यात - आवाज, उंची, स्क्रीन प्रेझेन्स, डोळ्यातली आग (सरकार, "मैने भाई को मार दिया" चा सीन)! तरी बापाचा क्लोन वाटत नाही ही खरंच खुप जमेची बाजू... अमिताभ बच्चन नावाच्या वटव्रूक्षाखाली खुरटून न जाणं तसं अवघडच! पण छान प्रगती केलिये जुनिअर एबी ने!

रिसेंटली फ़रहा खान / श्यामक दावर कडुन हात पाय हलवायचे धडेही घेतलेत बहुधा... बराच सुधारलाय - रेफ़्युजी मधला अभी आणि आताचा... बराच फ़रक आहे, नाही?

तर आता सुधारलेला, स्थिरावलेला, स्वत:चा जम बसलेला अभिषेक... त्यात स्वत:चं करियर उतरणीला लागलंय पण अजुनही वेळ गेलेली नाही अश्या परिस्थितीत - settling down हे खरंच मस्तच attractive असणार ना ऍश ला?

ह्या पोस्टवर ट्युलिप ऍश ऍण्ड कंपनी मला टोमणे मारणार आहेत - 'मेल शॉविनिस्ट' म्हणुन - पण आपुन को जो लगा वो आपुन ने लिख डाला बाप! ये आपुन का ब्लॉग है! इधर सिर्फ़ आपुन का हुकुम चलता है, क्या? :-P

जोक्स अपार्ट - गेले दोन महिने खरंच हॅपनिंग होते पण... खुप काम होते (आणि आहे) आणि इथे काही ना काही चालुच आहे! शिल्पा शेट्टी आणि सेलेब्रिटी बिग ब्रदर (CBB) ला घेउन इथे केव्हढा गहजब झालाय!! जेड गूडी, डॅनियाल आणि जो ओ'मिरा ला तर आता वाटत असेल की कुठुन अवदसा आठवली आणि ह्या गेम शो मध्ये भाग घेतला!

अर्थात त्यांच्या आजच्या परिस्थितीला बर्याच अंशी त्यांचं स्वत:चं वर्तनच कारणीभुत आहे! CBB चे एपिसोड्स ज्यांनी पाहिले असतील त्या सगळ्यांनाच ह्या त्रिकुटाला डिफ़ेंड करणं किती अवघड आहे हे जाणवलं असेल! त्यांचं वर्तन जास्त हायलाइट होण्याचं आणखी एक मुख्य कारण म्हणजे शिल्पा शेट्टी! बॉलिवूड मुविज मध्ये युपी बिहार ला लुटायला निघालेली ही आयटेम गर्ल प्रत्यक्षात एकदम controlled, soft-spoken, कुठल्याही प्रकारच्या provocation खाली सुद्धा स्वत:ची डिग्निटी न सोडता वागणारी व्यक्ती असेल असं मला कुणी सांगितलं असतं तर माझा विश्वासच बसला नसता! But she was amazing in Celebrity Big Brother!

शिल्पाने भारताचं नाव काढलं ह्यात शंकाच नाही! इथल्या तिच्या एका शब्दावरुन गहजब करायला टपुन बसलेल्या मिडियाला तिने तशी संधीच दिली नाही! उलट तिच्या तश्या वागण्यामुळे इथल्या प्रसार माध्यमांना तिची दखल घेणं आणि तिचं कौतुक करणं भाग पडलं!

काल परवा 'बूट्स' मध्ये एका मॅगेझिनमध्ये जेड चा फ़ोटो दिसला आणि आपोआपच हेडलाइनकडे लक्ष गेलं - तिला जिवानिशी मारण्याच्या धमक्या येताहेत म्हणे! CBB संपल्या संपल्या दुसर्याच दिवशी बातमी आली होती कि डॅनियालच्या बॉयफ़्रेण्ड (टेडी शेरींघम, फ़ूट्बॉलपटू) ने तिला सोडचिठ्ठी दिलीये... आणि आता काल जो ला सायकॊलॊजिस्ट्ची ट्रिट्मेंट चालु असण्याची बातमी आलिये - तिने CBB च्या निर्मात्यांना नोटिस दिलिये म्हणे!

कुणालाही अश्या गोष्टींना सामोरं जावं लागु नये हे खरंच.

पण ह्या त्रिकुटाला जस्टिफ़ाय करणं अवघड आहे हे ही तितकंच खरं!

त्यांच्या सगळ्या वागण्याच्या विडिओ टेप्स आधीच CBB वर प्रकाशित झाल्यामुळे त्यांना स्वत:चा बचाव करणं जड जातंय! I hope that this controversy dies down soon and these people start with their usual life again - leaving behind this dark episode!

गेले काही दिवस घरी टीवीवर शाहरूख उड्या मारतोय - 'कर ले कर ले इक सवाल' म्हणत... पण त्या विषयी पुन्हा कधी तरी... :-)

13 Comments:

Blogger himan8pd said...

oooo...

kadhipasun baghte tar khoop busy disat hotaas. malaa vatlaa maharaj
office cha kaam kartaa aahet pan haa tar saglyaanaa news detoo thodkyaat mahinyaabharat tv var kaay ghadaamodi zalyaa yaachi mahiti saadar karnyachaa kaam suru hotaa kaay ...

jyaa lokaani yaa 1 mahinyaat tv naahi paahilaa tyanii himanshuchyaa lekhi news nakki vachaa

tinggggggg tonggggggg
shubhangi

Thursday, February 08, 2007 3:43:00 pm  
Blogger Meghana Bhuskute said...

Hehee nase thoDake... :)

Thursday, February 08, 2007 5:39:00 pm  
Blogger भिकू म्हात्रे said...

आय डोन्ट नो, म्यान. मला तर तो मुळीच आवडत नाही. वीसेक चित्रपटांमध्ये काम केल्यावर कोणालाही खपवता येणारा अभिनय येइल. सैफ अली खानचंच उदाहरण घ्या. ’बच्चन्स’ चे PR चांगले असणार. आय थिन्क, तो नुसतीच हाइप आहे. बट, द्याट्स जस्ट मी. :)

Thursday, February 08, 2007 8:11:00 pm  
Blogger अभिजीत कुलकर्णी said...

आयेला, सही!! बाबा तुझ्या ब्लॉगवर आम्हाला अशी इतकी प्रसिद्धी मिळाल्याचं पाहून अंगावर २ मूठ मांस चढलंय! ;-)

मला स्टार्स च्या खाजगी आयुष्याबद्दल हमेशासेईच तिटकारासा वाटत आलाये. निल्या जेव्हा शाहरूख च्या लहानपणच्या आणि लग्नाच्या फोटोंचं कलेक्शन मला दाखवायचा, किंवा घरातल्या सख्ख्या मोठ्या भावाची यशस्वी प्रेमकहाणी सांगावी इतक्या तन्मयतेने जेव्हा त्याने मला शाहरूख आणि गौरी ची प्रेमकथा सांगितलेली, तेव्हा, तेव्हा मी स्वत: शाहरूखचा डाय-हार्ड पंखा असूनही माझा निरुत्साह काठोकाठ भरलेला होता. आताही तसंच आभी आणि ऍशच्या लग्नाबद्दल मला वाटतंयं.

मला जेव्हा बिग बी आवडतो, तेव्हा तो जी भूमिका करतोये त्या व्यक्तीच्या मी प्रेमात पडलेला असतो. इन्स्पेक्टर विजय असो की 'भाय' विजय, की 'डॉन'.. इव्हन के.बी.सी. मधला बिग-बी ही मला अमितभची भूमिका करणारा अमिताभ वाटतो, आणि मला त्या कलाकारापेक्षा ती भूमिका आवडते.. सेम वॉस ऑल्वेज अबाउट 'राज मल्होत्रा', 'राहूल', 'राहूल जोशी', 'सूनील' बाय शाहरूख. अभी मला तुकड्यातुकड्यातच आवडलाये, ही हॅस टू गो अ लॉंग वे तू मेक ऍन इम्पॅक्ट ऑन मी विथ हीस वन सिंगल रोल. (मी अजून गुरू पाहीला नाहीये.)

तेव्हा त्यंचं लग्न कधी होतं, आणी होतं तरी की नाही, आय डोंट केयर!

शिल्पाबद्दल.. हम्म.. सगळा सेटप होता असाच डाउट मला जास्त आहे. डोन्नो!

बाय द वे, गूड पोस्ट! :-D

Friday, February 09, 2007 9:24:00 am  
Anonymous Anonymous said...

heman
"पण दोन्ही 'ऍश'नी चांगले 'अभि' गटवले बरं! :-) "

hech vakya tu ulata pan mhanu shakatos ;-P

..ani mazhya adhi shubanginech pakadala tula
he he he :)

Friday, February 09, 2007 1:31:00 pm  
Blogger अभिजीत कुलकर्णी said...

this latest comment looks to be written by "my" ash. ;-) pan tine login na karata lihilaye, ki blogger ne ticha naav gayab kela? --Abhi.

Friday, February 09, 2007 5:08:00 pm  
Blogger Tulip said...

ash ch career hindi films ata utaranila lagayala adhi top var hotach kadhi re? ek HDDCS sodala tar ti acting madhe kaym ch superflop hoti. nehami model ch vatali. ati sunder model. raincoat madhe try thik hota. pan thik ch. tya manane tya something kundur9nav visarale) ani iruvar asha kannad films madhech chhan vatali ti. [ ani tujha dost abhi chya ash che looks tichya peksha kititari nakkich sweet n lively ahet:D]. i think abhishek shi lagn hach tichya career cha highest poitn ahe. btw.. tya abhishek la ek ugich dokyavar chadhavalay tumhi lokani. sarkar, B and B madhe avadala malahi to pan agadich okayish acting ahe tyachi. bapacha kahi vaarasaa birasa nahi ha chalavatay to. amitabh madhe kadhihi n adhalela to ek agadi 'loser' look tyachya madhe kayam disto. dolyatale bhav pan kadhich intense nahi vatale tyachya.
jara jastch negative jhaliy ka comment abhi-ash baddal? asu det. PAA. :P

Monday, February 12, 2007 8:27:00 am  
Blogger सहज said...

Cinema - Guru

Scene - Mithunda la pahilyanda kathat ki Guru bhai aapla aani aaplya press cha vapar karto aahe. Guru la bolvaun, WheelChair var baslelya Vidhya balam samor to Madhavan la vicharto - "kya tum iss aadmi ko sab ke samne nanga kar sakte ho ?"

Guru bhai maan tirki karun Vidya Balan kade baghato aani hasto.

Abhishek Bacchan has arrived!!

Wednesday, February 14, 2007 7:53:00 am  
Blogger Abhijit Bathe said...

baba -
kaaheetaree chaangala lihee naahitar jeew de!
maazyaa magachyaa 2 mahinyaatalaa kuThalaahee ardhaa taasahee yaapekshaa jaast exciting hotaa.
pakawu nako aaNi net warachee space waayaa ghaalawu nako. ashaane 'waachakawarg' duraawel.

- mama

Thursday, February 15, 2007 2:26:00 am  
Blogger himan8pd said...

Thanks everyone!

तुमच्या सगळ्या भल्या बुर्या कॉमेंट्सबद्दल आभारी आहे!

ट्युलिप / भिकु : अभिषेक / ऐश्वर्या दोघेही माझ्या ऑल टाइम फ़ेवरीट लिस्ट्मध्ये येत नाहीत... त्यामुळे तसा मी ह्या जोडीबद्दलच्या तुमच्या विचारांमुळे फ़ार बिथरणार वगैरे अजिबात नाहिये! :-)

सहज : यु सीम टु बी अ फ़ॅन! आय हॅव नथिंग अगेन्स्ट इट! इन फ़ॅक्ट आय ऍम हॅपी टु सी समवन ऑन देअर साईड! :-)

मामा : ब्लॉगिंग करण्यामागचा तुझा हेतु मला माहित नाही. माझ्यासाठी हा एक छान विरंगुळा आहे. माझ्या लिटररी कुवतीबद्दल माझ्या फ़ार हाय-फ़ाय कल्पना नाहियेत. माझ्या मनात त्या क्षणी जे असतं ते मी लिहितो. ते मी फ़ारसं एडिट देखिल करत नाही. जसं मनात येईल तसं लिहित जातो! आता ते कुणाला आवडतं किंवा आवडत नाहीही कदाचित... हे पोस्ट तुला आवडलं नाही आणि ते तू मोकळ्या मनाने सांगितलंस त्याबद्दल आभार.

पण माझा काही वाचकवर्ग आहे आणि तो ह्या पोस्टमुळे दुरावेल ह्या दोन्ही गोष्टी मला पटत नाहीत. हो, तुझ्याइतकीच तीव्र घ्रूणा कुणाला ह्या पोस्ट्बद्दल वाटलीच तर ते सरळ इग्नोअर करुन पुढे जातील इतकंच. पण मुळात कुणी वाट वाकडी करुन हा ब्लॉग वाचावाच असा माझा आग्रहच नाहीये! पोस्ट टाकुन मला समाधान मिळतं. त्यात कधी कधी चार समविचारी (किंवा विरुद्धविचारी!) मित्र भेटतात - आवर्जुन कॉमेंट टाकतात हा बोनस!
माझा प्रत्येकच ब्लॉग प्रत्येक वाचकाला आवडावा अशी अपेक्षा ठेवण्याइतका एफ़र्ट मी त्या ब्लॉगसाठी घेतलेला नसतो! सो आय टेक युअर क्रिटिसिज़म ऑन बोर्ड बट कान्ट ग्यारंटी युअर नेक्स्ट विजिट हिअर विल बी वर्थ द एफ़र्ट! :-)

Thursday, February 15, 2007 11:24:00 pm  
Blogger Abhijit Bathe said...

गाटिट.

Saturday, February 17, 2007 6:00:00 am  
Blogger अभिजीत कुलकर्णी said...

baba, pudhe lihi kahitari ata. tuzya blog var maza naav pahun pahun suddha pakalo ata. ;-)

Wednesday, March 21, 2007 6:34:00 pm  
Blogger Abhijit Bathe said...

Baba - my next visit here 'will be' worth the effort he maahitiye mhaNun roj roj tuzaa blog baghun damalo aataa.

Cmon man - atleast write about Ananya's birthday! (also - what she thinks of her name!)

Friday, March 23, 2007 2:15:00 am  

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

Links to this post:

Create a Link

<< Home