ऍश, अभि आणि शिल्पा...
गेले दोन महिने जाम म्हणजे जाम बिझी आहे! श्वास घ्यायला वेळ नाहिये, ब्लॊग कुठुन लिहिणार... शेवटी इंद्राची आराधना केली तेव्हा प्रसन्न झाला देवांचा राजा - आणि आजचा हा दिन दिसला! आख्ख्या इंग्लडमध्ये स्नोफ़ॊलने धुमाकूळ घातलाय... सगळ्या मिटिंग्ज कॅन्सल्ड - ऑफ़िसला ऑफ़िशियली दांडी... म्हटलं देवाने दिलेल्या 'स्नोसंधी' ला गमावायला नको! :-)
चलो ब्लॉग लिखते हैं!
नेहमीप्रमाणेच जेव्हा तुम्हाला कॉमेंट करायला वेळ नसतो तेव्हाच काही मोट्ठाले इवेंट्स होउन जातात.
उदा. ऍश-अभीची ही नवी जुनिअर जोडी... अहो आपली आहे की अभिजित कुलकर्णी - अश्विनी कुलकर्णीची ओरिजिनल जोडी... हे अभिषेक-ऐश्व्रर्य़ा तर कालचे छोकरा-छोकरी! :-P
पण दोन्ही 'ऍश'नी चांगले 'अभि' गटवले बरं! :-)
'ऍश सिनियर' बद्दल अजुन जास्त काही लिहुन मला फ़टके नाही खायचेत पण 'जुनियर ऍश' को तो बॉस मान गये! क्या चॉइस है! मला वाटतं बच्चन्स आता भारतातलं सगळ्यात मोठं सेलेब्रिटी कुटुंब होणार आहे! अभि जरा चाचपडला सुरुवातीला (सिनियर नाही हो जुनिअर!)... पण आताशा त्याला चांगलाच सूर गवसलाय!
सरकार, बंटी और बबली, ब्लफ़मास्टर, गुरू, धुम १ आणि २, दस...
बर्याच पिक्चरमध्ये चांगला चमकलाय...
हो, कधी कधी त्या वाढलेल्या दाढीत आंघोळ न करता आल्यासारखा वाटतो खरा पण बाकी बर्याच बाबतीत त्याने बापाकडुन चार चांगल्या गोष्टी घेतल्यात - आवाज, उंची, स्क्रीन प्रेझेन्स, डोळ्यातली आग (सरकार, "मैने भाई को मार दिया" चा सीन)! तरी बापाचा क्लोन वाटत नाही ही खरंच खुप जमेची बाजू... अमिताभ बच्चन नावाच्या वटव्रूक्षाखाली खुरटून न जाणं तसं अवघडच! पण छान प्रगती केलिये जुनिअर एबी ने!
रिसेंटली फ़रहा खान / श्यामक दावर कडुन हात पाय हलवायचे धडेही घेतलेत बहुधा... बराच सुधारलाय - रेफ़्युजी मधला अभी आणि आताचा... बराच फ़रक आहे, नाही?
तर आता सुधारलेला, स्थिरावलेला, स्वत:चा जम बसलेला अभिषेक... त्यात स्वत:चं करियर उतरणीला लागलंय पण अजुनही वेळ गेलेली नाही अश्या परिस्थितीत - settling down हे खरंच मस्तच attractive असणार ना ऍश ला?
ह्या पोस्टवर ट्युलिप ऍश ऍण्ड कंपनी मला टोमणे मारणार आहेत - 'मेल शॉविनिस्ट' म्हणुन - पण आपुन को जो लगा वो आपुन ने लिख डाला बाप! ये आपुन का ब्लॉग है! इधर सिर्फ़ आपुन का हुकुम चलता है, क्या? :-P
जोक्स अपार्ट - गेले दोन महिने खरंच हॅपनिंग होते पण... खुप काम होते (आणि आहे) आणि इथे काही ना काही चालुच आहे! शिल्पा शेट्टी आणि सेलेब्रिटी बिग ब्रदर (CBB) ला घेउन इथे केव्हढा गहजब झालाय!! जेड गूडी, डॅनियाल आणि जो ओ'मिरा ला तर आता वाटत असेल की कुठुन अवदसा आठवली आणि ह्या गेम शो मध्ये भाग घेतला!
अर्थात त्यांच्या आजच्या परिस्थितीला बर्याच अंशी त्यांचं स्वत:चं वर्तनच कारणीभुत आहे! CBB चे एपिसोड्स ज्यांनी पाहिले असतील त्या सगळ्यांनाच ह्या त्रिकुटाला डिफ़ेंड करणं किती अवघड आहे हे जाणवलं असेल! त्यांचं वर्तन जास्त हायलाइट होण्याचं आणखी एक मुख्य कारण म्हणजे शिल्पा शेट्टी! बॉलिवूड मुविज मध्ये युपी बिहार ला लुटायला निघालेली ही आयटेम गर्ल प्रत्यक्षात एकदम controlled, soft-spoken, कुठल्याही प्रकारच्या provocation खाली सुद्धा स्वत:ची डिग्निटी न सोडता वागणारी व्यक्ती असेल असं मला कुणी सांगितलं असतं तर माझा विश्वासच बसला नसता! But she was amazing in Celebrity Big Brother!
शिल्पाने भारताचं नाव काढलं ह्यात शंकाच नाही! इथल्या तिच्या एका शब्दावरुन गहजब करायला टपुन बसलेल्या मिडियाला तिने तशी संधीच दिली नाही! उलट तिच्या तश्या वागण्यामुळे इथल्या प्रसार माध्यमांना तिची दखल घेणं आणि तिचं कौतुक करणं भाग पडलं!
काल परवा 'बूट्स' मध्ये एका मॅगेझिनमध्ये जेड चा फ़ोटो दिसला आणि आपोआपच हेडलाइनकडे लक्ष गेलं - तिला जिवानिशी मारण्याच्या धमक्या येताहेत म्हणे! CBB संपल्या संपल्या दुसर्याच दिवशी बातमी आली होती कि डॅनियालच्या बॉयफ़्रेण्ड (टेडी शेरींघम, फ़ूट्बॉलपटू) ने तिला सोडचिठ्ठी दिलीये... आणि आता काल जो ला सायकॊलॊजिस्ट्ची ट्रिट्मेंट चालु असण्याची बातमी आलिये - तिने CBB च्या निर्मात्यांना नोटिस दिलिये म्हणे!
कुणालाही अश्या गोष्टींना सामोरं जावं लागु नये हे खरंच.
पण ह्या त्रिकुटाला जस्टिफ़ाय करणं अवघड आहे हे ही तितकंच खरं!
त्यांच्या सगळ्या वागण्याच्या विडिओ टेप्स आधीच CBB वर प्रकाशित झाल्यामुळे त्यांना स्वत:चा बचाव करणं जड जातंय! I hope that this controversy dies down soon and these people start with their usual life again - leaving behind this dark episode!
गेले काही दिवस घरी टीवीवर शाहरूख उड्या मारतोय - 'कर ले कर ले इक सवाल' म्हणत... पण त्या विषयी पुन्हा कधी तरी... :-)